उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका पुढे ढकला, सभांवर बंदी घाला ; अलाहाबाद हायकोर्टाचे मोदींना आदेश

0

अलाहाबाद :- देशात कोरोना विषाणुचा व्हेरीअंट ओमिक्रॉनचा  वाढता प्रादुर्भाव पाहता येणाऱ्या काळात पुन्हा गर्दीवर निर्बंध लावावावे लागू शकतात  अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना उत्तर प्रदेश निवडणुका पुढे ढकलण्याची आणि सभांवर तात्काळ बंदी घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांचे काय होणार? अस प्रश्न आता सर्वांनाच पडाला आहे. देशात सध्या ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत आहे. त्यातच अनेक राज्यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. यावरून हायकोर्टनं मोदींना रॅलींवर बंदी लावण्याचे तसेच आता होणारी निवडणूक तुर्तातास टाळण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका जसा जगाला आहे, तसाच भारतालाही आहे. उत्तर प्रदेश हायकोर्टात न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या खंडपीठासमोर एका जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी कोर्टातील गर्दी पाहून कोर्टाने मोदींना हे आवाहन केले आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅली आणि सभांवर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. कोर्टाने म्हटले आहे की, निवडणुकीचा प्रचार टीव्ही आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून करावा. तसेच मोदींनी निवडणुका तहकूब करण्याबाबतही विचार करावा असे मतही नोंदवले आहे.

पुढे कोर्टाने सांगितलं की, उत्तर प्रदेश ग्रामपंचायत निवडणुका आणि बंगाल विधानसभा निवडणुकांमुळे अनेकांना संसर्ग झाला होता, तसंच अनेकांचे मृत्यू देखील झाले होते. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या रॅली आणि सभा आयोजित केल्या जात आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे अशक्य आहे.

Leave a comment