राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, स्वराज्य संघटनेची स्थापना; छत्रपती संभाजीराजे यांची पुण्यातून घोषणा

0

पुणे: संभाजीराजे यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ मागील काही दिवसापासून संपला आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना अनेंकवेळा पुढील काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र आता या सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिले आहेत. यामध्ये त्यांनी दोन महत्व पूर्ण घोषणा केल्या आहेत. संभाजीराजे यांच्या राजकीय वाट चालीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

संभाजीराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा ही आहे की, त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यांमुळे आता ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांनी आपण  राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी आज सांगितले आहे. आपल्याला सगळ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात 29 अपक्ष आमदार असून आपण त्यांची पाठिंब्यासाठी वैयक्तिक भेट घेणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम लागला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत बरीच उत्सुकता होती. ते वेगळा पक्ष काढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. छत्रपती संभाजीराजे यांनी पक्षाची घोषणा न करता स्वराज्य नावाची संघटना स्थापन करत असल्याचे जाहीर केले. संघटनेचे चिन्ह किंवा रंग काय असेल असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की याबाबत अजून काही ठरलेले नाही. यापुढे महाराष्ट्राचा जो दौरा होईल त्यामध्ये लोकांकडूनच आम्हाला चिन्ह काय असावे किंवा रंग काय असावा याबाबतची मते कळू शकतील. मात्र असं असलं तरी रक्तातील आणि हृदयातील केशरी पट्टा कोणी काढू शकत नाही असे छत्रपती संभाजीराजेंनी आवर्जून सांगितलं.

Leave a comment