स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आघाडी सरकार एकत्र लढणार कि नाही याबाबत शरद पवारांनी दिले उत्तर, म्हणाले…

0

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता प्रत्येक पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकांसाठी सज्ज होत आहेत. या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकार युती करणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे करणार का यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे.

कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.  ते म्हणाले कि, कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत गैरसमज झाला आहे. कोर्टाने सांगितले कि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जिथून तयारी केली आहे तिथून पुढे तयारी करा. १५ दिवसात सुरुवात करा असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला दोन ते अडीच महिने लागतील. आमच्या पक्षामध्ये याबाबत  दोन मते आहेत. काही जणांचं मत आहि कि स्वतंत्र लढावं आणि नंतर एकत्र यावं. तर काहीच म्हणणं आहे सरकार  एकत्र चालवतो तर त्यादृष्टीने एकत्र योग्य राहील. परंतु याबाबत निर्णय झालेला नाही. पुन्हा एकदा चर्चा करणार आणि याबाबत आम्ही निर्णय घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले कि कोर्टाने असं सांगितलं आहे कि जी निवडणूक थांबवली होती ,ज्या टप्प्यात थांबवली होती, तिथून पुन्हा सुरु करा. काही ठिकाण अद्याप याद्या तयार नाहीत. काही ठिकाणी हरकती मागवायच्या आहेत. या हरकती मागितल्यावर एक महिना जातो. त्यानंतर वॉर्ड रचना होते. त्याला एक महिना लागतो. त्यानंतर महिला, मागासवर्गीयांची राखीव वॉर्ड रचनेसाठी एक महिना जातो त्यामुळे या निवडणूक घेण्यासाठी अडीच ते तीन महिने लागणार आहेतच. त्यामुळे १५ दिवसात निवडणूक जाहीर करणं शक्य नाही , १५ दिवसात प्रक्रिया सुरु करा असा आदेश कोर्टाने दिला आहे. आणि ज्या ठिकाणी आरक्षित जागा होती तिथे आरक्षित वर्गाचा उमेदवार देणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

Leave a comment