उद्धव ठाकरेंची आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे ; संजय राऊतांचं मोठ विधान

0

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वांद्रे-कुर्ला संकुलात जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. आजची सभा ही क्रांतीकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

या सभेबद्दल शिवसेना नेते संजय राऊत बोलताना म्हणाले कि, महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल.  महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल.  पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  त्यांनी म्हटलं की, आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे, असं ते म्हणाले. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असं राऊत म्हणाले.

पुढे म्हणाले कि, हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरे हेच होते आणि राहतील आणि आहेत. बाकी आम्ही सगळे हिंदुंचं संघटन करत आहोत आणि त्यांना लढण्याची प्ररेणा देत आहोत. हिंदुजननायक कोण?, महानायक कोण? हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट आणि लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान राहील.

Leave a comment