आपण शिवसेनेचे नेते आहात परंतु तुम्हाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून महाराष्ट्र समजतो, प्रवीण दरेकरांचा राऊतांना टोला

0
प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष हे संजय राऊत यांचा वापर कशापद्धतीने करत आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यामुळे आपला वापर होत असताना पक्षाचा वापर होत आहे व आपला पक्ष कसा रसातळाला चालला आहे याची काळजी व आत्मचिंतन करण्याची गरज सध्या राऊतांना आहे. त्यामउळे दुसऱ्याचा वापर कोण करतंय यापेक्षा आपल्या वापराने त्या ठिकाणी पक्षाच्या अस्तित्वाला सुरुंग लागतोय याच भान आणि जाणीव संजय राऊत यांना आहे कि नाही हे मला माहित नाही, त्यावर त्यांनी बोलावं असे दरेकर म्हणाले. आपल्या पक्षाच्या हिताच्या चार गोष्टी कराव्यात आणि आपण शिवसेनेचे नेते आहात परंतु तुम्हाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून महाराष्ट्र समजतो आहे. यावरून आपला वापर कोण कशा पद्धतीने करत आहे हे नव्याने सांगायची गरज नाही.

संजय राऊत नेमके काय म्हणाले ?
 
राज ठाकरेंवर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असं काही मी म्हणणार नाही. काय अडचणी आहेत हे मला माहीत नाही. पण भाजपने मात्र, असं का करावं? पण ठिक आहे. यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. यातून नुकसान होतं हे काही लोकांना उशिरा समजतं. काही लोक तीर्थयात्रेला जातात. तेव्हा यात्रेत काही अडचणी येतात. तेव्हा लोक विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचा मदतकक्ष आहे यासाठी.’ अयोध्या, वाराणासीत हा मदत कक्ष आहे. आम्ही धार्मिक लोकं आहोत. कुणाला काही याबाबत अडचण असेल तर आम्ही त्यांना मदत करतो. आम्ही राजकारणाचा अभिनिवेश मागे ठेवतो.’
Leave a comment