शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने केली ऊसाच्या एफआरपीत वाढ

0

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी 25 ऑगस्ट रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ सीसीईएच्या (CCEA) बैठकी दरम्यान ऊसाची रास्त आणि मोबदला किंमत म्हणजेच एफआरपी (Fair & Remunerative Price) ५ रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अखेर या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारने ऊसाचा खरेदी दर वाढवून २९० रुपये प्रति क्विंटल केला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढून 290 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. गोयल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी एफआरपीमध्ये 10 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती. साखरेची एफआरपी 290 प्रति क्विंटल आहे, जी 10 टक्के वसुलीवर आधारित असेल. 70 लाख टन साखरेची निर्यात होईल. त्यापैकी 55 लाख टन झाली आहे. सध्या 7.5 टक्के ते 8 टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे. पुढील काही वर्षांत मिश्रण 20 टक्के होईल. आजच्या निर्णयानंतर भारत हा एकमेव देश असणार आहे जो ऊस उत्पादकांना साखरेच्या किंमतीच्या सुमारे ९० ते ९१ टक्के ऊस मिळणार आहे. जगभरातील देशांमध्ये ऊस उत्पादकांना साखरेच्या किंमतीच्या ७० ते ७५ टक्के ऊस मिळतो.

सरकारच्या धोरणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. उसाची एफआरपी किंमत 290 रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा 87% परतावा मिळेल. इथेनॉल उत्पादन, साखर निर्यातीला प्रोत्साहन, साखर उद्योगाला बफर स्टॉकद्वारे पैसे देणे, अशा निर्णयांनी ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळतील याची खात्री करण्यात आली आहे. शिवाय एफआरपीच्या किंमतीत वाढ झाल्याने आता साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवली जाऊ शकते. त्यामुळे साखर कारखान्यांना देखील मोठा फायदा होणार आहे.

 

 

Leave a comment